Sunday 29 June 2008

चारोळ्या

काय सांगु तुला सखे
तुझ्या वागण्यात बालिशपणा वाटतो
त्या खट्याळ नजरेनेच
गुदगुल्या झाल्याचा भास होतो

***************************

काय सांगु तुला सखे
एरवी तु खुप गोड दिसतेस
पण दातात करंगळी दाबुन हसल्यावर
कैरीची आंबट फोड वाटतेस

***************************


आठवणींमध्ये तुझ्या सखे
भुतकाळात हरवुन जातो
तुझ्याबरोबर घालवलेल्या क्षणांना आठ्वुन
अश्रुंना वाट मोकळी करुन देतो.

***************************

जिवनाच्या या वाटेवर
खुप सारे वाटसरु भेटतात
भेटणारे भेटतात रे
पण फ़क्त काहिच साथ देतात.

***************************

ओठ गुलाबी हे
आणि अंगावरी लाल साज
शिशिराच्या या सकाळी
वाटे उन्ह पडले आज

***************************

वाटायचे मज ब-याचदा
सांगावे तूज सर्व काही
शब्द ओठी जमू लागलेच होते
पण त्या शब्दास आता अर्थ नाही

***************************

तू नसताना मज सोबती
कसे फुटावे शब्दांना धुमारे
वाटते की सावलीच हरवली
मग शब्दतरी कशी साथ देतिल बिचारे.

***************************

लेखक : आनंद

1 comment:

  1. Krupaya Kavi/Lekhak/Charolikar/sahityik yamchi naave purna dyavit ani shakya asel tar tyanchya blogchi linkhi dyavi...

    Ya ani ashya aanakhin charolya yethe pahavaya milatil ;-)

    www.chaaroli.blogspot.com

    ReplyDelete