Thursday, 24 July 2008

गुगलपुराण- टिप्स & ट्रिक्स

गुगल फक्त सर्च इंजिन नाही, तर तो आहे वेबमित्र. Think what you can't think, google will search for you असं म्हटलंय ते उगीचच नाही. इंग्रजी भाषेत आता 'टू गुगल' हा 'टू सर्च' या क्रियापदाचा पर्याय ठरला आहे. 'आय एम गुगलिंग समथिंग' म्हणजे मी काहीतरी शोधतोय, हे सर्वत्र रुढ झालंय. पण हे गुगलिंग फक्त वेब आणि चित्रांपुरतं मर्यादित नाही. तर हा आहे अनंत अशा सायबर विश्वाचा न संपणारा अखंड शोध... हा शोध अधिकाधिक सोपा व्हावा यासाठी नाना क्लृप्त्या सांगणारं हे 'गुगलपुराण'...


1)कॅल्क्युलेटर

वेळ पडली तर गुगल कॅल्क्युलेटरही होतं. कसं ते पाहायचंय... गुगलवर जा आणि लिहा ७८९२+३९३९ मग एण्टर दाबा. पाहा उत्तर तुमच्या समोर हजर. फक्त बेरीज वजाबाकीच नाही तर टक्केवारी, वर्गमुळापासून साइन, कॉस, टॅनपर्यंत एक कॅल्क्युलेटर जेवढी आकडेमोड करतो ती सारी गुगलवर करता येते.

2)करन्सी कन्वर्टर

एखाद्या वस्तूची किंमत जर ७६५ अमेरिकन डॉलर आहे. तर आपल्या डोक्यात सर्वात आधी येतं ते ७६५ अमेरिकन डॉलर म्हणजे किती रुपये. मग पेपरमधल्या डॉलरचा भाव शोधण्यापासून नेटवरील करन्सी रेटचार्टपर्यंत सारे उपाय अजमावून पाहिले जातात. पण कशासाठी एवढी झंझट??? गुगल है ना! 765 USD IN INR एवढं टाका गुगलमध्ये आणि करा सर्च... पाहा गुगल कसं पटकन उत्तर देईल ते.

3)युनिट कन्वर्टर

ब-याचदा असं होतं की, आपल्याला आपली उंची पाच फूट सात इंच आहे अशी माहिती असते आणि एखाद्या फॉर्मवर सेण्टीमीटरमध्ये उंची लिहायची असते. आता टेप घेऊन भिंतीशेजारी उभं राहावं लागणार किंवा आली पुन्हा आकडेमोड. पण इथेही दोस्त गुगल आहे की राव! 5 feet 7 inch in cm असं गुगलवर टाका, एण्टर करा आणि उत्तर समोर हज्जर... फक्त फूट, इंच, सेण्टीमीटर नव्हे तर अर्धा कप म्हणजे किती टीस्पून हेही गुगल सांगतं... खोटं वाटतं पाहा half a cup in teaspoons टाकून...


3 comments:

  1. Thanks!!! mal Ycha Khoop vapar Honar Ahe....Are Kharch Thanks.

    ReplyDelete
  2. Thanks!!! mal Ycha Khoop vapar Honar Ahe....Are Kharch Thanks.

    ReplyDelete
  3. tumache swagat aahe, mala anand aahe yaat

    ReplyDelete