Friday 25 July 2008

गूगलपुराण -भाग 2

आपण गुगलचा उपयोग कॅलक्युलेटर, करन्सी कन्वर्टर आणि युनिट कन्वर्टर म्हणून कसा करायचा ते पाहिलं. आता दुसऱ्या फेरीमध्ये जरा 'हट के' टेकट्रीक्स पाहूयात.

1)सेफसर्च
बऱ्याचदा असं होतं की आपण काही तरी जेन्युइन माहिती शोधायला जातो आणि काहीतरी भलतंच समोर येतं. फॉर एक्झाम्पल, 'ब्रेस्ट कॅन्सर' सर्च दिल्यानंतर 'भयानक'च काहीतरी मिळतं जे चारचौघात बघताच येणार नाही. अश्लील, प्रोहिबिटेट अशा अनेक लिंक काही ठिकाणी सापडतात.घरी आईबाबांसमोर असं काही तरी उघडणं म्हणजे संपलंच.यासाठी 'गुगल'नेच एक ऑप्शन देऊन ठेवलाय. तो म्हणजे सेफसर्चिंग. safesearch:breast cancer असं सर्च दिलं की गुगल तेच शोधून देईल जे तुमच्या अभ्यासाचं आहे.

2)हे किंवा ते
पाहिजे असणारी माहिती काहीवेळा दोन समानाथीर् शब्दांनी शोधता येते. मग आपणच गोंधळतो की नक्की काय सर्च दिला तर परफेक्ट माहिती मिळेल. पण जेव्हा असं कन्फ्युजन होईल, तेव्हा फ्रेण्डलोक नो प्रॉब्लेम... गुगल हैं ना! उदाहरणार्थ, बोटिंग आणि सेलिंग काहीही शोधलं तरी सारखीच माहिती मिळणार आहे. अशा वेळी दोनदोनदा सर्च देण्यापेक्षा साधी आयडिया वापरायची. sailing OR boating असं टाइप करायचं आणि गुगलला सांगायचं की आता शोध रे....

3)नेमकं हेच हवं
एकापेक्षा अधिक शब्दांची माहिती मिळवायची असेल तेव्हासुद्धा गोंधळ होतो. म्हणजे 'मुंबई सेण्ट्रल स्टेशन' असं सर्च दिलं की आपले गुगलमहाराज एवढे हुश्शार की मुंबई, सेण्ट्रल आणि स्टेशन असे शब्द असणाऱ्या सापडतील तेवढ्या लिंक तुमच्या पुढ्यात आणून ठेवतील. हे टाळण्यासाठी एक छोटीशी गोष्ट करायची. Mumbai Central Station असं शोधण्यापेक्षा "Mumbai Central Station" असा सर्च द्यायचा.

4)काय म्हणतंय हवामान?
वेगवेगळ्या ट्रिक्स देताना मध्येच हवामान कुठून आलं असं वाटलं ना... हीच तर गम्मत आहे गुगलची.. इथं कोणताच विषय वर्ज्य नाही... 'काय उकडतयं? वैताग आहे नुसता' असं म्हणायचे दिवस संपताहेत... पावसाच्या हलक्या सरी सांगून गेल्यात की पाऊस उंबरठ्यापर्यंत आलाय... मग आपल्याला हवामानाचा अंदाज घ्यायला हवाच... त्यासाठी आपलं गुगलही सज्ज आहे. weather:(Mumbai) असं सर्च करा आणि घ्या तुमच्या शहराच्या हवामानाचा अंदाज... बघा तर खरं... पाऊस कुठपर्यंत आलाय तो...

No comments:

Post a Comment