Wednesday 30 July 2008

मला पुन्हा एकदा ....

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...



कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा
दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामान्च्या अभन्गाचा अर्थ
आता थोडा कळायला लागलाय,
तो बरोबर आहे ना.. हे विचारयला...
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय


No comments:

Post a Comment