शब्दात जगताना
शब्दच सर्वस्व बनते
विसर पडतो वास्तविक जगाचा
शब्दातच मन रमते
शब्दच मनाशी भांड्तात
हळूच मग कागदावर सांडतात
शब्दच बनतात खरा सखा
साथ देतात सुख अन दु:खा
शब्द कधी होतात
पावसाची धार
कधी होतात वार्याची
झुळुक गार
कधी गोंजरतात मनाला
हळूवार स्पर्शानी
कधी जखमी करतात
धारदार शस्त्रावानी
--चेतन बच्छाव
No comments:
Post a Comment