Wednesday 30 July 2008

महाराष्ट्र माझा

लाल काळी माती इथली
अठरापगड जाती
कणखर आहेत मनं अमुची
फडके झेंडा जगी

शिवरायाचे वारस आम्ही
कृष्णा कोयना माता
विठुराया तर बाप अमुचा
सह्याद्री आहे सखा


इथे जन्मला शेर शिवबा
इथे जन्मली गानकोकिळा
इथेच जन्मले लोकमान्य अन
इथे जन्मले ग्यानबा तुका

अभेद्य आहे अजोड आहे
आहे महाराष्ट्र अमुचा
इथे जन्मलो इथे वाढलो
पावन झाला जन्म अमुचा

अखंड वादळे झेलीत राहील
महाराष्ट्र माझा
शतकानुशतके असाच राहील
महाराष्ट्र माझा


No comments:

Post a Comment