Monday, 21 July 2008

आला पाउस कोवळा- kavita

आला पाउस कोवळा
आला पाउस कोवळा
मन मोरपिस झाले
कश्या बरसल्या सरी
सारे गाव पाणावले
आता येइल साजण
मन होइल मोगरा

माती सुवास उधळी
कसे गाणे आतुरले
आली शहाऱ्याची लाट
कशी मोहोरली वाट
पाऊस खुळा झाला
मन माझे खुळावले
मनी "संतोष" दाटला
नभी दाटला पाउस
बरसल्या "अमॄता"च्या
तन-मन सुखावले

No comments:

Post a Comment