कवापासनं घरची मागं माह्या लागल्यात…
अतातरी दोनाच, चार कर की म्हणत्यात..
गड्यानॉ, आसल काय बी करायच न्हाय…
नस्त्या झेंगाटात आडकायचं मला न्हाय..
………………………………औंदा लगीन करायच न्हाय.
कुठं राव त्या बायकांच्या नादी लागता…
रोज रोजची कटकट न वटवट, आयला…
ह्ये कर, त्ये आन् रोज मग मरान हाय…
ह्याला बघ,त्याला ने रोजचं ग्रहान हाय…
………………………म्हणून औंदा लगीन करायच न्हाय.
म्या महनतो, भाजी न भाकरी जळाली…
तरी..म्हणावं लागतं काय मस्तच हाय…
मोकळा फिरता येणार न्हाय..नि गावच्या
पोरीकडं बी दिलखुलास बघता येणार न्हाय…
……………………..म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.
बस का, यावर थोडा च भगणाराय सगळं..
त्यानंतरच ‘लचांड’ मग मागचकी लगतय…
बा ह्ये घे,बा त्ये घे एकत आन् करत करत
म्हातरपण पण मग हळूहळू सराय लागतय…
…………..आन् मग म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.
झाकच की, मामाच्या शालीशीच लगीन ठरतय..
बघताय काय आसं? तिच्यात माहा जीव हाय..
वर ज्ये काय म्हनालय़,.. त्ये इसारा की राव….
माणूस बी चुकतोच की कधी, का खाताय भाव?
…………………इचार करतोय औंदा लगीन करावं की काय?
नाय, तसं न्हाय…तिचं नखरं सोशीन म्हणतो….
जळकी भाकरी डोळेझाकून घशाखाली उतरवतो….
गावच्या पोरिमधी…. नाहीतरी ठेवलयच काय?
म्हातारपनाला आपलीच पोरं असणार की न्हाय?
….जाऊ द्या सगळेच म्हनत्यात, तर औंदा लगीन करणार हाय..
Source : Email
No comments:
Post a Comment