रात्र वैरी सरली तिची
अब्रुही लुटली तिची
आता उणे श्वास फक्त
प्राक्तने मिटली तिची
देह व्यापार बास झाला
घरी आहे कोणी आजारी
लेक आक्रंदतो आहे..
पाउले उठली तिची
रोज अत्याचार होतो
रोज निलामी जगाशी
रोज लढतांना स्वतःशी
भावना मरते तिची
वाटते संपुन जावा
जीव एखाद्या क्षणाला
लेकराची हाक येता
आरोळी भिजते तिची
हे असे किती जगावे
पण तरी जगतेच आहे
रोज काटेरी उशाला
रात्र तळमळते तिची !!
आसवे डोळ्यात न्हाली
चेहरा हसरा तरी
आतमध्ये आग होती
ती कशी विझली तिची ??
कवि : संतोष (९८८११५८८४५)
No comments:
Post a Comment