Sunday, 24 August 2008

Marathi Joke : स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री

स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.
एक बायको एकदा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा विचारतो, तेव्हा ती सांगते, "अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते."

नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही. तो तिच्या सर्वात जवळच्या १० मैत्रिणींना फोन करतो. त्याची बायको आपल्याकडे आली नव्हती, असंच दहाहीजणी सांगतात.

आता जेव्हा एक नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही, तेव्हा काय होते पाहा. दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते, तेव्हा तो सांगतो, ''अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो.''

बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही. ती त्याच्या सर्वात जवळच्या १० मित्रांना फोन करते. त्यांतले पाचजण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्याच्याच घरी होता. उरलेले पाचजण तर, आत्ताही तो आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात!!!

No comments:

Post a Comment