Wednesday, 20 August 2008

Marathi Kavita : फक्त तुझ्याचसाठी आजही

फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे.......
कविता लिहायला बसलो की हातच पुढे सरकत नाही
डोळ्यातले अश्रू पाहुन लेखणीतुन शाईसुध्दा सांडत नाही

किती माझ्या भावना सांगु, किती आता विचार मांडू
तुझ्या आठवणींच्या पावसात पुन्हा पुन्हा किती भिजू

येते येते म्हणत तु नेहमीच अशी निघून जातेस
स्वप्नातुन जागा करुन पुन्हा मला एकटा पाडतेस

आता पुरता थकलो आहे तुझी वाट पाहून
तरीसुध्दा तुझ्याच वाटेवर बसलोय डोळे लाऊन

माझं काय विचारतेस आता माझी कविताही थकली आहे
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे.......

No comments:

Post a Comment