Sunday 28 September 2008

Life's True : आयुष्यातील काही सत्य

  1. प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत. मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच ...
  2. समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि तारतम्याने वागायचे असते. त्याचप्रमाणे एक माणूस दूसर्‍या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादे पर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो.म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होउ नये.
  3. बायको म्हणजे कशी हवी ? आपण बिथरलो तर आपल्याला सावरणारी हवी , स्वतःच बिथरणारी नको, थोडक्यात म्हणजे पेपर वेट सारखी हवी, खालचे कागद फडफडतील पण ती स्वतः गडगडणार नाही, चळणार नाही, नी खालचे कागदही उडू देणार नाही...
  4. आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्शणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो. असंच माणसाचं आहे... समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यात्ल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.
  5. मृत्यु म्हणाला येऊ का ? मी म्हटलं आत्ताच ये...  कायम एकटाच जगलो...  तु तरी सोबतीला ये....
  6. चांगल्या गोष्टी त्याना लाभतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्याना लाभतात जे प्रयत्न करतात. सर्वोत्तम गोष्टी त्याना लाभतात, जे आपल्या प्रयतनांवर अतूट विश्वास ठेवतात.

No comments:

Post a Comment