Friday 26 September 2008

Marathi Quote - Part-II

  • ज्याला गरज निर्माण होते त्याला ती एकदम लाचार, दुबळा बनवते. आणि जो ती गरज पुरवू शकतो त्याला ती अचाट सामर्थ्यवान आणि उद्दाम बनवते.
  • कोणतही समर्थन मूळ दूःखाची हकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची , ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे, ती ज्याची त्याला ठसठसत असतेच. 
  • आठवणी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारुळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग एक अशा असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणीचं ही तसंच आहे.

No comments:

Post a Comment