Thursday, 11 December 2008

Marathi Kavita : काळीजखुशीनं मन माझं

इथं तिथं धावलं,
रेतीत उमटवत त्याची
इवली इवली पावलं...

समुद्राचं पाणी
अचानक कावलं,
वाहुन नेली त्याने
माझ्या मनाची ती पावलं...

वेड्या माझ्या
मनाचं त्यातसुद्धा फावलं,
दोन घटकेच्या खुशीत
त्याचं इटुकलं काळीज पावलं ...!

No comments:

Post a Comment