Monday, 15 December 2008

Marathi Kavita : आमचे शिवराय कोण ?

परवा अमचे अनेक बजीप्रभु लढता लढता कामी आले
त्या रक्तातून अनेक बजीप्रभू तानजी सन्ताजी धनाजी जन्मला येतिल.....
लढतील अगदी शेवटच्या श्वासापर्यन्त .....
पण एक प्रश्न मात्र रहतोच आमचे शिवराय कोण ???????

नावात शिव असलेले आमचे गृहमन्त्री नाही.....
केसाचा कोम्बडा अन अपली खुर्ची जपणारे आमचे सीएम नाही....
आजचे सन्त आमचे आबा मुळीच नाही....
शिवरायाचे नाव घेत मराठी मणसाना भुलवणारे दोन भाउ अजीबात नाही....
शेतीचे मन्त्रि अन क्रिकेट चे राजा असणारे आमचे साहेब अन त्यान्चे असन्ख्य चमचे अजित नाहि माफ करा अजिबातच नाहि.....

शिवराय आज कुठे आहात ? कारण आज आम्ही खुप घाबरलोत....
मावळे आजही तयार आहेत देशासाठि लढायला, पण आमचे सरदार मात्र लढतात आपापसात लुटुपूटुची लढाई....अन लुटतात आपल्याच प्रजेला....
शत्रू मग येतो उघड उघड, गारद करतो आमचे शूर मावळे...
आमचे सरदार मात्र लपतात बिळा,त आपापल्या शेपूट घालून्...
राजे आता सम्पले युद्ध ...गारद झाले १० १२ शूर शिपाई अन शेकडो प्रजाजन...

आता येतील सारे सरदार बाहेर बिळातून आपापल्या पुन्हा सुरु लुटुपुटूच्या लढाईचा खेळ ...
राजे आता तुमचीच गरज आहे महाराष्ट्राला..

नाहितर असेच आम्ही हतबल.....नाह्क बळी अजून काहि शिपायान्चे.....
फावत राहिल असेच शत्रूचे...अन माततील हे सरदार असेच कायमचे..
तेव्हा राजे तुम्ही याच परत बाजीप्रभू वाट पहाताहेत तुमची......

-
Anand Kulkarni

No comments:

Post a Comment