Tuesday, 23 December 2008

Marathi Kavita : कुणीतरी असावे

कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं
भरलेच डोळे कधी तर ओलं आसवानां पुसणारं !

कुणीतरी असावे
पैलतिरी साद घालणारं
शब्दानां कानात साठवुन गोड प्रतिसाद देनारं !

कुणीतरी असावे
चांदण्याच्या बरोबरो नेणारं
आंधारलेल्या वाटेत
आपल्या सोबत येणारं !

कुणीतरी असावे
फुलासारखं फुलणारं
फुलता फुलता सुगंध दरवळणारं !

कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं
पलिकडील किनार्‍यारुन आपली वाट पाहणारं !2 comments:

  1. कुणीतरी AAHE AAPLE KAVITA VACHNARE....GOOD Yaar Keep it up....

    ReplyDelete
  2. kavita fantastic aahe

    ReplyDelete