रोज काही लिहीत रहावे
आहे असे काहीसे ठरवले...
पुन्हा प्रयत्न करायचा,
मिळवायचे जे जे हरवले....
होती कधी सवय मला
फक्त कवितेतून बोलायची..
जे जे यायचे मनी ते
यमकातून मांडायची...
पण आता आहे प्रश्न पडला
यमके कशी जुळवायची ?
मनीच्या भावांची कवितेतून
भट्टी कशी जमवायची
कवि : विनायक
No comments:
Post a Comment