Saturday 6 June 2009

Marathi Kavita : चांद रात

चांद रात मंद वात
गंध श्वास टाकतो
धुंद साथ उष्ण हात
हृदयी कंप जागतो.


नील जल प्रतिबिंब
चंद्र त्यात पाहतो.
लुब्ध मुग्ध शुभ्र पुष्प
पारिजात ढाळतो


रक्त ओष्ठ रक्त नेत्र
भ्रमर ही मोहतो.
मत्त वक्ष पुष्ट गात्र
सलील हाताळतो.


एक भास एक ध्यास
काम ज्वर जाळतो
व्यस्त केश भ्रष्ट वस्त्र
फुंद रास खेळतो


धूम्र वर्ण पीत वस्त्र
अधर तो चावतो
प्रणयातुर झाली राधा
कृष्ण वेड लावतो.


-
कवि : शेखर

No comments:

Post a Comment