माझा दादा... तसा साधाच....
शाळेत जाताना. ड्बलसीट घेणारा..
मधल्या सुटीत.. डब्याची चौकशी करणारा...
शाळा सुटल्यावर परत हात धरून घरी आणणारा....
मला आठवतय...
अर्धि जास्तीची पोळी माझ्या ताटात वाढणारा..
आणि त्याच्या खरेदी आधी माझी खरेदी करणारा....
माझा दादा... तसा साधाच...
आठवतय.. 'जो जीता वोही सिकंदर...'?
'करण'?... अगदी तस्सा...
नेहमी मला पाठीशी घालणारा...
माझा दादा... तसा साधाच....
वडिलांच्या छत्रानंतर..
कधीही अंतर न देणारा ...
माझा दादा.. तसा साधाच...
थोडा शांत पण खूपसा हसराच...
खूप विचारांती निर्णय घेणारा..
तो बरोबर असला की वाटतं,
या वटावृक्षाखाली छोटेसे रोपटं
त्याच्या पारंब्या धरून वाढतय ..
परत त्या तप्त उन्हात जायची इच्छा नाहीए आता..
याच सावालीत, सावालीतलं झाड म्हणून जगायची इच्छा उरलिय आता..
वयाने मोठा नाहीए खूप...
मात्र , अनुभवाने माझे आभाळ व्यापलाय त्याने....
मित्र तो, सखा तो..मार्गदर्शाकही तोच..
आणि ... आणि ..आदर्श ही तोच..
त्याचे हास्स्य बघायचेय?
मग जरा मला हसरे बघा....
बघा किती मनमोकळे हसेल तो....
या त्याच्या हस्या साठीच तर आज मी हसतोय...
मी नेहमी हसरा असु दे.. असेच देवकडे रोज मागतोय...!!!
माझा दादा.. तसा साधाच...!!
-पराग....
No comments:
Post a Comment