जाणीवेच्या आत खोल
एक जाणीव दाटलेली
वस्ती उठल्या गावात
एक चौकट मोडलेली ॥
भणभणे भकास वारा
घर मोडल्या गावकुसात
तुळशीविणा व्रुंदावन
उभे गवताळ अंगणात ॥
पडक्या देवळात
उभी विठ्ठल रखुमाई
ओस पडल्या गोठयाच्या
गिधाडा मुखी गाई ॥
उन्हं भाजल्या घरात
जळका कुबट वास
देवराई गेली जळुनी
उभी कोळश्यांची रास ॥
वहिवाटीच्या वाटा
कधीच गेल्या मोडुन
फ़ुलण्याआधीच कळ्या
कुणी नेल्या खुडुन ॥
स्थलांतरीत झाले सारे
राहीला ना मागमुस
गायरानी गवताचे
रान पडले भकास ॥
विजयकुमार.........
ओस पडल्या गोठ्याच्या
ReplyDeleteगिधाडा मुखी गाई॥
विषण्ण करणारे सत्य.
khar ahe......
ReplyDelete