Wednesday 15 July 2009

Marathi Kavita : बालपण

बालपणीची गम्मत-जम्मत
होती हो निराळी,
दप्तर टाकुन खांद्यावरती
जावे लागे सकाळी...!

मित्रांचा घोळका जमायचा
करायची पोरं कमाल,
चालु तासामद्धे उडवा विमाने
अन् व्हायची मग धमाल...!

बाईंनी रागवल्यानंतर
मित्राऐवजी आपले नाव सांगायचे,
मित्रावरचे फटके प्रेमापोटी
आपणच झेलायचे...!!!!

उन्हाळ्याच्या अन् दिवाळीच्या सुट्ट्यामद्धे
हमखास मुक्काम मामाच्या गावी,
क्रिकेट, विट्टी-दांडू खेळता खेळता
सुट्ट्या मात्र भरकन जाई...!

शाळा पुन्हा भरताच
सांगायची मजा दोस्तांना,
अन् किती यायची आठवण मित्रांची
सुट्ट्या चालु असताना...!!!

नाही राहिले दप्तर आता
नाही कागदी विमाने,
आठवणी राहिल्या सोबती
घावांनंतरच्या जखमांप्रमाणे...!!!

आजचे जीवन माझे
सुखसुविधांनी सा~या सजलेले,
तरीही मन हे माझे
बालपणीच्या आठवणीत रमलेले...!!!

- केवल

No comments:

Post a Comment