Thursday, 16 July 2009

Marathi Kavita : पाउस, ती आणि बावळट....!

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,
जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!

भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!

जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!

तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!

"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."

ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"

बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!

कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!

अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"

"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"
स्वप्न होते, सत्य नाही... झोपेतून उठवत होती आई...!

स्वप्न आठवून हसलो जरासा
कॉलेजात जेव्हा दिसली राणी,
मैत्रिणींशी थट्टा करत
मला ती 'बावळट' म्हणुन गेली...!!!

- केवल

1 comment: