Friday 4 September 2009

Marathi Kavita : दुरावा

बंगल्यासमोरची झोपडी आता मनात आहे बसली,
तिच्यात आसरा घेणारी ती गरिबी आहे कसली!
काळ्या काळ्या रंगाचे ते सुरकुतलेले हात
करू शकतील का हो दारिद्र्यावर मात?
झोपडीत रहाणारी म्हातारी रोज येते कामाला,
अन् गोड भाकरी खाऊ घालिते आम्हाला.
रोज गरम गरम भाकरी वाढतात मला,
पण शिळ्या पोळीचा अर्धाच तुकडा का बरे देतात तिला?
दिसून येते अशावेळी तिच्या दारिद्र्याचे दुःख,
अशॄंने चमकू लागतात डोळे लख्ख लख्ख!
संध्याकाळी आभ्यासाला बसतो जेंव्हा लाईटच्या उजेडात,
दिसून येते समोरची ती कंदिलाची वात.
वाटते पलीकडे जाऊन घालावे तिला वंदन,
पण काय करू, बोचतं मधलं एवढं मोठं कुंपण!


-धृवांग

No comments:

Post a Comment