Saturday 5 September 2009

Marathi Kavita : खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा
तू यौवनाची मुसमुसलेली कळा
चालविला ह्रुदयावर नजरेचा विळा
अजुन वाहे जखम ती भळभळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

तनुवर नौवारीचा वेढा
जणु तो मोरपिसाचा सडा
पाहुनी ह्रुदयाचा होई तो चोळामोळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

यौवन बान्धे तुझी काचोळीची गाठ
त्यातुन डोकवी कोरी कोरी पाठ
सावरताना मी ग होतो क्षुल्लकसा पाचोळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

गज-याचा सुगन्ध होतो भोवती गोळा
सान्गतो तनुचा भार असे कोवळा
हि बाला म्हणजे रती कुमारी सोळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

मी काय करावे कवित्व यौवनाचे
शब्दान्चा खजिना अपुरा माझ्या वाचे
शब्दान्चे किती ग कण कण केले मी गोळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

-दीपक

No comments:

Post a Comment