Tuesday, 8 September 2009

Marathi Kavita : धडा

दुसरीतल्या डोंगरे बाई
त्यांचे मोठ्ठे डोळे आणि
पट्टी धरलेला बिन बांगड्यांचा हात

सोमवारी पंधरा ते वीस चे पाढे
पाठ करुन यायला सांगितले
पण शनीवार गेला सुजय, पप्प्या बरोबर
रवीवारी मावशीकडे टिनी मिनी
संध्याकाळी सिनेमा संपल्यावर आठवण झाली...

तसाच बसलो पाठ करायला
पण अठरा एकोणीस काही
डोक्यातच शिरेनात
एकोणीस तर आडा टेढा
घुसेचना डोक्यात
डोळ्यांना झोप आवरेना
मनाला झोप येईना

रात्रभर स्वप्नं ...पाढे
डोंगरेबाईंची पट्टी आणि बिनाबांगड्यांचा हात...
आणि एकोणीसचा पाढा

रात्रीत सारखा दचकून उठत होतो
शाळेत माझा नंबर येईतो
मी भितीने अर्धमेला
आणि बाईंनी नेमका...
...वीसचाच पाढा विचारला.

त्या दिवशी एक नवीनच धडा शिकलो
उगाच भितीने मरायचं नाही.

--
टल्ली

No comments:

Post a Comment