हे आजचे गीत आहे, आजचा हा उमाळा..
काल ही नवाच होता
आज ही नवा नवा..
हा आजचा भाव आहे, आजची ही कविता..
कालही खराच होता
आज ही खरा खरा..
थांबल्या जगात तरीही, राग तोची तो जुना..
कोत्या जगात अजूनही
आलाप तोची तो पुन्हा..
हा आजचा बोल आहे, आजची ही दुविधा..
कालही दऱ्याच होत्या
आज ही दऱ्या दऱ्या..!
कवि : स्वाती फडणीस
कल्पना चांगली आहे, पण काही कडवी छंदा च्या बाहेर वाटतात.
ReplyDeletekadave chukiche ase vatate pan shabd changle aahet...
ReplyDelete