प्रत्येकाच्या आभाळाचा रंग निळा असतोच असं नाही!
आणी निळ्या आभाळाखाली जगणार्यांची तरी
सगळीच स्वप्नं निळी कुठे असतात?
खरं तर निळ्या स्वप्नांची गरज
लालभडक आभाळाखाली जगणारांनाच!
कर्दमांत लोळणार्यांसाठी तर कधीकधी
लाल देखील आभाळ नसतं----------
पण म्हणून काही ते जगणं सोडत नाहीत!!
माथ्यावर आभाळ आहे की नाही ते बघायला सुद्धा
रिकामा वेळ असावा लागतो-----------
आणि त्याचा रंग शोधायला प्रकाश!!!!!
जगावं की मरावं ह्याची चिंता
हेम्लेटसारख्यांनी खुश्शाल वहावी--------
माथ्यावरच्या निळाईची शान राखायला.......
सगळ्या हेम्लेटांच्या आयांसाठी मात्र
ऐश्वर्यमहालाचं छतच सत्य असतं!!!!!!
कवि : प्रभा
No comments:
Post a Comment