सांजवेळी सोबतीला, मी तिला बोलावले
ती नव्हे भाऊच आला, पत्र त्याला घावले
तो म्हणाला थांब साल्या, तंगडी तोडीन मी
पत्र ज्याने तू खरडले, हात ते मोडीन मी
मी म्हणालो शांत हो रे, राग का आहे तुझा?
तूच साला मेहुणा मी, घोळ झाला रे तुझा
या विनोदा मीच हसलो, तो उभा दगडापरी
एकटा हा काय करतो? लावतो याला घरी
हाक त्याने मारली नी, चार गाड्या धावल्या
एक मागे एक सा-या भोवताली लावल्या
टोणगे होते सभोती, तो न आल एकटा
जीव प्रेमाहून प्यारा, गप्प रस्त्याने सुटा
कवि - राज
Chaglich bhetali diasate...
ReplyDelete