एक कविता शब्दांची
कागदावर उतरलेली
दुसरी प्रत्यक्षातली
मनामध्ये ठसलेली
एक आहे साहित्यातला
सुंदर आविष्कार
दुसरीचे हास्य जणू
धबधब्यातला तुषार
एक आहे साहित्यातली
अनादी आणि अनंत
दुसरीला मिळेना
आयुष्यातून उसंत
एकीसाठी झटत आहेत
विश्वातले साहित्यिक
दुसरीसाठी मरत आहेत
*** सारखे कितीक
कविता आणि कविता
दोन्ही लाख मोलाच्या
आमच्या आयुष्यात
दोघीही महत्वाच्या
कवि - महेश मोहरे
No comments:
Post a Comment