Friday, 12 August 2011

Marathi kavita : घेवो कवेत आकाश ...

चोची-चोचीने ईवल्या
जमवूनी काडी-काडी ,
शोध-शोधीत फ़िरते
रानं-वनं , फ़ांद्या-झाडी...


क्षितिजाच्याही पल्याड
दिसे सिमेंट-कॊंक्रिट ,
शोधु कुठे नदी-नाले ?
बांधू कुठशी घरटं ?


तुझा चॊसोपी गं वाडा
पुढे-पाठी गं अंगण ,
देई-देई गं आडोसा
मी गं पहिलीट्करीणं...


काट्या-कुट्या नि कापूस
बाई जरा-थोडं सोस ,
चिव-चिवाट गं पिल्लांचा
लाजवेल सनईस....


नवा-मासाची तपस्या तुझी
जशी आली फ़ळाळून ,
पंखाखाली अंडी माझ्या
उबो-वाढो रातदिनं...


राजाबिंडा घरधनी
तुझं गोंडस गं बाळ ,
भरवीन ईल्लु-घास
पिल्ला पंखा येण्या बळं...


बघ सोनुलं गं तुझं
रोमरोमी दिव्य ध्यास ,
उडो पिल्लू माझं असं
घेवो कवेत आकाश ...



कवि : ______

No comments:

Post a Comment