Sunday, 14 August 2011

Marathi Kavita : पक्षी

रानात झोपलेले पक्षी उडून गेले
माझ्या घरात माझे डोळे भरून आले

देवून साद रात्रि झाडीत दूर कोठे
त्या काळ भोर रात्रि त्यांनी प्रयाण केले

नाजुक पावलानी त्यानी हळूच यावे
त्यांचाच चाहुलीने डोळ्यात पंख ओले

आता कुणास सांगू माझा मुक्या व्यथा या
आकाश सुन्न आहे डोळ्यात गोवलेले

केव्हा,कसे मिळावे माझे अबोल पक्षी
त्यानीच सर्व माझे डोळे लुटून नेले

त्या दूर दूर वता आता उजाड़ झाल्या
माझे सुरेल गाने त्यानी चुकून नेले


कवी - कियोस्का

No comments:

Post a Comment