Monday, 5 September 2011

Marathi Kavita : प्रत्येकाच्या मनात...

प्रत्येकाच्या मनात असते एक कविता
भाग्यवान ज्यांना व्यक्त होण्यास मिळते शब्द सरिता.....

प्रत्येकाच्या मनात असतात भावनांचे सागर
भाग्यवान ज्यांना मिळते शब्दांची किनार ..........

प्रत्येकाच्या मनात असतात कल्पनेचे मोती
भाग्यवान ज्यांना ते शब्दांत गोवता येती...............

प्रत्येकाच्या मनात असतात आठवणींच्या लाख कळ्या
भाग्यवान ज्यांच्या कळ्या शब्दरुपाने फुलल्या.........

प्रत्येकाच्या मनात असतात असंख्य कृष्णविवरे
भाग्यवान ज्यांना मिळतात शब्दरूपी प्रकाशांची दारे.......

प्रत्येकाच्या मनात असतं निरागस चांदण
भाग्यवान ज्यांना चांदण्यासाठी मिळते शब्दांचे कोंदण...........

प्रत्येकाच्या मनात असतो सदैव एक मी
भाग्यवान ज्यांना लीन करता येतो मी शब्दब्रम्ही..........कवि : पंकज

No comments:

Post a Comment