Monday 19 September 2011

Marathi Kavita : जमेल का पून्हा लहान व्हायला?

"क्षणात घेतात कट्टी
अन क्षणात घेतात बट्टी
आवडते त्यांना शाळा
जर असेल तर सूट्टी

कोणाच काही न ऐकनारा
स्वभाव त्यांचा हट्टी
धाक दाखवायला घ्यावी लागते
हातामध्ये पट्टी

अभ्यासाचा वेळी यांना
खेळ भारी सुचतो
क्लासमध्ये बसल्या बसल्या
बाजुवाल्याला पेन्सीलच टोचतो

छडीसारखे प्रसाद तर
यांना रोजचेच भेटतात
दप्तर फ़ेकून घरात
खेळायला पळतच सुटतात

अभ्यासात नेमके यांचे
पाढेच कसे चुकतात
गणित सोडवायला घेतल की
हातचे एकच हुकतात

चित्र काढतांना मात्र
चित्रामध्येच घुसतात
ओरडा खाऊन मोठ्यांचा
कोपर्‍यात जाऊन बसतात

अस हे लहाणपन पून्हा कधीच
वाट्याला कुणाच्या येत नाही
लहान मुलांबरोबर खेळतांना
ठरवूनही मन लहान होत नाही
....मनापासून



कवि : _________

3 comments:

  1. अस हे लहाणपन पून्हा कधीच
    वाट्याला कुणाच्या येत नाही
    लहान मुलांबरोबर खेळतांना
    ठरवूनही मनात हेच विचार येतात खरच लाहाणपन किति छान होते मला परत ते लाहणपन मिळाले तर खुब चांगले वाटेल.

    ReplyDelete