Wednesday, 21 September 2011

Marathi Kavita : सुख


सुखा मागे धावता धावता विवेक पडतो गहाण,
पाण्यात राहूनही माशाची मग भागत नाही तहान.
स्वप्न सत्यात आनता आनता दमछाक होते खुप ,
वाटी वाटीन ओतले तरी कमीच पडत तुप .


बायका आणि पोरंसाठी चाले म्हणे हा खेळ,
पैसा आणून ओतेन पण मागु नका वेळ.
करियर होत जीवन मात्र जगायच तंत्र ,
बापाची ओळख मुले सांगती पैसा छापयाच यंत्र.


चुकून सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुना स्वताहच्याच घरी ,
दोन दिवस कौतुक होत नंतर डोकेदुखी सारी.
मुलच मग विचारू लागतात बाबा अजुन का हो घरी ?
त्यांचाही दोष नसतो त्याना सवयच नसते मुळी.


क्षणिक औदासीन्य येत ,मात्र पुन्हा सुरु होत चक्र ,
करियर करियर दलन दलता स्वास्थ्य होते वक्र .
सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती चढलेल्या ,
आतून मात्र मातीच्या भिंती कधीही न सारवलेल्या .


आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागत काही
घालान्याच्या हट्टापाई श्वासाच मुळी घेतला नाही .
सगळ कही पाहता पाहता आरशात पाहन राहून गेल ,
सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेल .



कवी - _________

No comments:

Post a Comment