Saturday, 10 December 2011

Marathi Kavita : मी

मी तर मी नाहीच
मनातले रुप माझे
कधी कधी तू स्मरताना
ओली पापणी करतोस का
नभाचे पाऊल वाकडे
कधी अंगणी पडते का

उद्याचे स्वप्न बापुडे
कधी आपले म्हणतोस का
गीत माझे स्मरताना
भास जवळी घेतोस का


मी तर मी नाहीच
तूला कधी मी दिसते का
गतकाळाच्या जिर्ण सावल्यां
कधी कुशीत तू भरतोस का

पाऊस वेडा सांगुन जातो
सरीसरीतुन भिजताना
तूला असेच होते कारे
पावसाचे मन जळताना

चिंब झाले मी राधा
नभी सावळा दिसला रे
तूझ्या सावलीचे भास सारे
तू ढगातून हसला ना

कवि : कल्पी जोशी

No comments:

Post a Comment