Wednesday, 21 December 2011

Marathi kavita : अंतिम

शोकसागरात होईल आयुष्य हे चूर
जाईन जितका मी तुझ्यापासुन दूर

करेन मी प्रेम याच्या-त्याच्यावर
होईल फिके तेही काही काळानंतर

कितीही मिळवले तरी सदा भासेल भ्रांत
नाही होणार माझा जीव कधिही पूर्ण शांत

सतत एक पोकळी मला जाणवत राहिल
भरायचा प्रयत्न करेन तेवढी वाढत जाईल

तूच अंतिम साध्य, भवसागरातुन मला तारणार
तुझ्यापेक्षा काहीही कमी मिळुन सुखी नाही होणारकवि : ________

No comments:

Post a Comment