Thursday 5 April 2012

Charoli : चारोळीला चारोलीने उत्तर

 दुखाच्या बाजारात..
कुणीच कधी फिरत नाही..
मी खुप सुखी आहे अस म्हननारा
कुणीच का बर भेटत नाही..?


मी सुखी, मी सुखी म्हणून ,
कोण बर सुखी झालाय,
सुखासाठी पळणाराहि,
दु:खाच्या बाजारी परका झालाय!!!


सुख असते फितूर प्रेमिका,
नेहमी ठेवते झुलत,,,,
दुःख असते प्रेमळ वेडे,
करी आयुष्याची सोबत.....!


सुख दु:खाची कशाला चिंता
दिवस जीवनाचे चार,
छोट्याश्या ह्या जिवानामंदी
हौस फिटोस्त्वर मजा मार...


दुःखा शिवाय जीवनात
सुखाला त्या चव काय
काट्यान शिवाय फुलाला
ग़ुलाब अस् नाव काय


दुःख नसेल तर..
आयुष्यात मजा काय...?
दुःख नसेल तर..
सुखाची चव कळणार कशी काय..?


दू:ख म्हणजे नक्की काय असत.....
जे उरत, जगताना.....
सुख म्हणजे नक्की काय असत.........
जे सरत, मरताना........
जे असत, जे कधी नसत....

No comments:

Post a Comment