Saturday 12 May 2012

Marathi Kavita : नसे मागणे

नसे मागणे काहीच आता तूला रे
सुखात लोळून जीव माजून गेला
करी राहुदे रेष अरे मेहनतीची
नको आयते, जीव लाडावलेला

नको मागणॆ गुलाबी ती छटा शराबी
नशेत जळून जीव हरवून गेला
धुके नको ते आता डॊळ्यापुढती
असो तोल मी माझाच सांभाळलेला

असो मी माझा आता खरा मित्र
नको ती आणि अन ते डोलते सत्र
घाव सारेच ते नशेचे नशीले
नको आता ती, अन झोकली रात्र





कवि : कल्पी जोशी

No comments:

Post a Comment