Saturday, 30 June 2012

Marathi Kavita : नाजुक

नाजुक तुझ्या गालावरती
लाली जेंव्हा पसरली
पहाटेची कोवळी किरणे
अस्तित्वच विसरली.

नाजुक तुझ्या गालावरती
पावसाचा थेंब
तीर होऊन त्यांचा
माझ्या काळजावरती नेम.

नाजुक तुझ्या गालावरती
हास्य नाजुक उमटले
उमलणे हा मक्त्ता नाही
हे फुलानांही पटले.

नाजुक तुझ्या गालावरती
तीळ तो लबाड
सर्पाच्याही नशिबी नसेल
असे सुरेख घबाड.

नाजुक तुझ्या गालावरती
ओठ माझे टेकले
चुंबने ही क्रिया कि प्रतिक्रिया
हे गुढ तेथे रमले.

नाजुक तुझ्या गालावरती
अश्रु ओघळले
असे होऊच कसे शकते?
हेच नाही कळले.

नाजुक तुझ्या गालावरती
कविता मी केली
शब्द माझे होते पण
कल्पना तुझ्या गाली.

नाजुक तुझ्या गालावरती
माझे शब्द शून्य झाले
परत जगायला, तुला शोधायला
दूर निघून गेले..कवि : अमितानंद सरस्वती

No comments:

Post a Comment