Sunday 1 July 2012

Marathi Kavita : क्षण


क्षण चालले, दिन चालले, अन् चालले आयुष्यही
जगणे न हे जगणे मुळी, ना खेदही ना खंतही

आकाश हे माथ्यावरी, आहे जसे, होते तसे
येतात अन् जातातही, घन सावळे, घन शुभ्रही

इतुके कसे हे एकसे , दिसतात सारे सोबती
हे चेहरे आहेत अन् हे चेहरे नाहीतही

या चुंबनातुन कोण ते, तू जहर हे आहे दिले ?
फुलते कसे गाणे पुन्हा, ह्या पोळल्या ओठातही ?

क्षण चालले, दिन चालले.... पण थांबलो मागेच मी
आता नको, ठेऊस तू, मजला तुझ्या स्मरणातही





कवि : प्रतिक्षा

No comments:

Post a Comment