मी कसा होतो ते तिला पूर्ण माहित होतं
जसा होतो तसा तिला आवडत होतो
बरं चाललं होतं एकुणात आमचं
मग कधीतरी ती म्हणाली
मला तुझं 'हे हे' आवडत नाही
तिला आवडत नाही म्हणून
मी 'हे हे' करणं बंद केलं
मग काही दिवसांनी ती म्हणाली
तू 'ते ते' करतोस
ना त्याचा मला राग येतो
मग मी 'ते ते' करणंही बंद केलं
मग सगळं बरं चाललं असताना
अचानकच ती म्हणाली
तुझं 'अमुक अमुक' मला अजिबात मान्य नाही…
झालं… मी 'अमुक अमुक' सोडून दिलं
अन मग
पुन्हा काही दिवसांनी म्हणाली
एकदम आईडियल आहे रे आपलं आयुष्य
फक्त तुझं ते 'तमुक तमुक' सोडलं तर…
झालं… मी 'तमुक तमुकही' सोडून दिलं…
आता खूप खूप दिवसांनी
मी माझं ‘हेहे', ‘तेते', 'अमुक
अमुक', ‘तमुक तमुक' सारं सारं
तिच्या सांगण्यानुसार
सोडून दिल्यावर आणि बंद केल्यावर
ती म्हणते आहे,
‘तू
आता पूर्वीसारखा नाही राहिलास
रे…'
आता बोला…!!
Link : #B_Red 
 
reaaalllll my true story. .. . .
ReplyDelete