Tuesday, 24 June 2008

आठवण

तुझी आठवण आली की मला माझाच राग येतो,

संपले ना सर्व तुझ्याकडुन मग असा का त्रास देतोस?नको त्या खोट्या शपथा, नको त्या सुखद आठवणी

आठवुण सर्व काय करु? मग डोळ्यात येते पाणीआठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत, तुला इतरांपासुन लपवू कसे?

भरभरुन वाहणार्‍या अश्रुंना थोपावून, खोटे हासु आणायचे तरी कसे?ते अश्रु लपवण्याच्या प्रयत्नांत, मग मी तुलाच दोष देत राहते

आणि या खोट्या प्रयत्नांत, तुला आणखीनच आठवत राहते!लेखिका: संचिता

No comments:

Post a Comment