Thursday, 26 June 2008

जीमेल - आणखी काही करामती

जीमेल पत्त्यात डॉट (.) चा उपयोगही फार खुबीने करता येतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमचा ईमेल पत्ता manmohansingh@gmail.com असा आहे. तर तुम्ही काही ठिकाणी तुमचा ईमेल पत्ता man.mohansingh@gmail.com असा देऊ शकता. किंवा आणखी काही जणांना तो manmohan.singh@gmail.com असाही देऊ शकता. किंवा अगदी पुढे जाऊन ma.n.mohansingh@gmail.com असाही किंवा m.a.n.mo.hansingh@gmail.com असाही आडवा तिडवा वाकवून देऊ शकता. तुमच्या नावात कुठेही आणि कितीही वेळा डॉट टाकला तरी ती मेल तुमच्या त्याच ईमेल अकाऊंटमध्ये येऊन पडत असते. काही जण अशा डॉटयुक्त ईमेल पत्त्यांचा उपयोग इंटरनेटवर मोफत रजिस्ट्रेशनसाठी वगैरे देण्यासाठी करतात.

दुसरी करामत + ह्या चिन्हाची. ही करामत समजून घेण्यासाठी आपण पूर्वीचा arun@gmail.com ह्या पत्त्याचा उपयोग करू. समजा ह्या अरूणसाहेबांना fun-karu.com नावाच्या अविश्वासार्ह वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ते arun+fun-karu@gmail.com असा पत्ता त्या साईटला देऊ शकतात. त्या साईटने त्या पत्त्यावर पाठवलेली मेल अरूणसाहेबांना मिळते ती arun@gmail.com ह्याच पत्त्यावर. तुम्हीही तुमच्या जीमेल पत्त्याच्या बाबतीत ह्या करामती करून पहा. अगदीच काही नाही तर टाईमपास किंवा करमणूक म्हणून हे करायला काहीच हरकत नाही.

1 comment:

  1. वाह फार उपयुक्ता माहीत भेटली आहे..
    आभारी

    ReplyDelete