Tuesday 24 February 2009

Marathi Charolya

माझ्या मनाच माझ्या मेंदुशी
छत्तीसचा आकडा आहे
माझं मन तसं सरळ आहे
या मेंदुचाच रस्ता वाकडा आहे.

प्रतेक गावाबाहेर
छोटा महारवाडा आहे
चवथीच्या पुस्तकात मात्र
समानतेचा धडा आहे.

इथे वेडं असण्याचे
खुप फायदे आहेत
शहाण्यासाठी जगण्याचे 
काटेकोर कायदे आहेत.

1 comment:

  1. पुन्हा ही एक नवी कविता.......! मैत्रीवर....!मैत्री.....!मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...कधी शिकवण कधी आठवण,तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.........माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी....मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.....कोऱ्य़ा माझ्या आयुष्यात मैत्रीचे चित्र तू चितारले,प्रेमाच्या सप्तरंगात ते चित्रही नाहून निघाले...पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..जीवनाच्या चित्रपटलावर वेगळेचं रंग रंगवणारी....मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी......

    ReplyDelete