Saturday, 14 February 2009

Marathi Kavita : हिशोब प्रेमाच

तुझ्या माझ्या प्रेम प्रकरणाचा
जमा खर्च एवढा पाहुण जा
तु मला दिलेलं घेउन जा
मी तुला दिलेलं देउन जा


स्विट होममधे कित्येकदा खाल्ले
आपण कचोरी समोसे
आत्ता प्रर्यत नेहमी मीच भरत आलो
बिलाचे सर्व पैसे
आज अखेरचं जाउ पोटभर कचोरी खाउ
किमान या बिलाचे तरी पैसे भरुन जा


लेक्चर बड्वुन मी फर्स्ट शोचं
ऍड्व्हान्स बुकींग करायचो
अन् आठवड्यात एक तरी
नाटक किंवा सिनेमा दाखवायचे
नाटकाचे माफ करतो
किमान सिनेमाचे तर पैसे देउन जा


आपलं हे प्रेम प्रकरण
तुझ्या पैलवाण भावाला कळलं जेव्हा 
एवढं बेदम ठोकलं मला
मी मरता मरता वाचलो तेव्हा
चार दिवस दवाखाण्यात, पंधरा दिवस अंथरुणात होतो तेव्हा
निदान भावाच्यावतीने तु माझी माफी तर मागुन जा


मी कुठुन तरी नोट्स मिळवायचो
परिक्षेच्या काळात मात्र तुला द्यायचो
मग तुला नेहमी फर्स्टक्लास मिळायचा
माझा मात्र एक तरी बॅकलॉक रहायचा
आता मात्र ऑल क्लियर व्हायला हवं
म्हणुनच माझ्या नोट्स मला परत देउन जा


आज जाता जाता तरी
आपल्या प्रेमाच हिशोब तरी पुर्ण करुन जा...

1 comment:

  1. http://marathi-e-sabha.blogspot.com/2009/02/blog-post.html

    ReplyDelete