Saturday, 14 February 2009

Marathi Joke : संताची 'भाई'गिरी

एकदम नाकासमोर चालणारा सज्जन माणूस कसा असतो? असं कोणी विचारलं, की लोक डोळे झाकून सन्ताकडे बोट दाखवत. कुठच्याही परस्त्रीकडे तो नजर वर करून पहात नसे. तर असा हा साधासरळ संता पाहता पाहता लग्नाचा झाला. त्यानं त्याच्या सरळ स्वभावामुळे परस्पर तर कुठे ठरवलंच नव्हतं. मग आईबाबांना स्थळं पाहण्यावाचून पर्यायच नव्हता. असंच विचारण्या- विचारण्यातून जसविंदरचं स्थळ चालून आलं. सुंदर जसविंदर त्याच्या घरच्यांना सून म्हणून तर आवडलीच पण तिचा फोटो पाहून संताचीही विकेट उडाली. आणि आज ही सगळी सिंग मंडळी जसविंदर कौरच्या घरी साग्रसंगीत पाहाण्याच्या कार्यक्रमासाठी गेली होती. पहिल्या-वहिल्या गप्पा झाल्या आणि दोघांच्याही आईबाबांनी त्यांना एकटं बोलायची मोकळीक दिली.

एकांतात...

गोंधळलेला संता : आपको कितने भाई है बहेनजी?

जसविन्दर : वैसे तो तीन है, लेकीन...

संता : लेकीन क्या जी?

जसविन्दर : अजी अब आपही बोल रहे है तो... आजसे मेरे चार भाई हो गये।

No comments:

Post a Comment