एक होती गुलाबी कळी
पुष्पकोषात पहुडलेली , नुकतीच जन्मलेली
पाकळ्यांची लोचने सुदधा न उघडलेली.
सकाळ होताच,
गुलाल उधळीत रविराजांची स्वारी आली.
फ़ांद्यांच्या गर्दीतून, पानांच्या दाटीवाटीतुन
मार्ग काढीत गुलाबी किरणे चहूकडे पसरली,
सगळ्यांना उठा-उठा करु लागली
निपचीत पडलेली कळी डोळे किलकिले करुन पाहु लागली;
कोणत्या बरे राजाची स्वारी आली?
सर्वाना विचारु लागली.
तेवढ्यात पानांच्या आडुन, फ़ांद्यांच्या पसारयातुन ,
तिला त्या रविराजांचे दर्शन घडले;
त्या लालगुलाबी सुर्याचे रुपा तिच्या मनात भरले !
पानांनी समजले, फ़ांद्यांनी अडवले,
पण कळीने कुणा कुणाचे नाही ऐकले.
पुष्पकोषाची बंधने दुर सारुन, सर्वाचे मन मोडुन,
कळीने आपले पंख पसरले !
कळीचे फ़ुलात रुपांतर झाले.
त्या गुलाबी स्पर्शाने कळी मोहरली.
त्या सुवर्ण स्पर्शासाठी ती आसुसली.
लाजुन अगदी लालेलाल झाली.
त्या आदित्याला भेटायला कळी पुर्ण उमलली
रविराजही मग आले मध्यावर किरणांच्या लावाजाम्यासह
आपले तेजस्वी रुप दाखवायला,
त्यांच्यावर भाळलेल्या कळीला जवळुन पहायला
कळी राहीली नव्हती आता कळी
तिचे केव्हाच झाले होते फूल
तिचे ते सुंदर सुहास्य सर्वाना घालीत होते भुल !!
सुर्यदेव अगदी मध्यावर् आले कळी सुदधा तयारीतच होती !!
पण हाय! त्या सुर्यराजांच्या किरणांची
कळीला झळ लागली.............
त्या तप्त किरणांची तिच्या अंगाची लाही लाही झाली
ती पानांचा आडोसा, फ़ांद्यांचा आसरा मागु लागली,
पण कुणीही आले नाही मदतीला,
"बरं झालं, असच पाहिजे !" असं म्हणु लागले सगळे कळीला
कळी बिचारी रडु लागली,
रडुन रडुन तिला धाप लागली
तिची रंग रंगोटी केव्हाच उतरली,
दमुन भागुन तिनं मान टाकली
शेवटी दया आली सुर्यदेवाला
त्यांनी ठरवले आता आपणच जाऊया अस्ताला
तेजस्वी रुप ते दुःखाने लालेलाल झाले
कळीला कुरवाळीत अस्ताला गेले!!
प्रेमात असंही होते
हे कळीला माहीत नव्ह्ते ...
कुणाच्या वाट्यला गुलाब असतात
तर कुणाच्या वाट्यला नुसतेच काटे !

No comments:
Post a Comment