Thursday 23 June 2011

Marathi Kavita : आस...





ये कवेत सखये
आता गं बंध कैसे,
हुरहूर कोवळी ती
अंगांगी मोहरून ये...

तुजलाच साद घाली..
हा स्वप्नधुंद वारा,
हृदयांत स्वप्न सारी,
जागवून ये...

हळुवार गूंजणारी
स्वरतान कोकिळेची,
वीणेवरी मनाच्या..
झंकारून ये...

शब्दांत व्यक्त कैसे
होतील भाव सारे..
संवाद साधणारी
कविता बनून ये...

डोळ्यांत शोध माझ्या
स्वत्वास तू स्वतःच्या,
वेदना साऱ्या जीवाच्या
मागुती सोडून ये... 


कवि : --------


No comments:

Post a Comment