Thursday, 28 July 2011

Marathi Kavita : माझा हस्यामंत्र

हसा आणि हसवा
हसून हसून लठ्ठ व्हा !
मनात आशेच्या कळ्या फुलवा
हस्याने करा सुगंधित हवा !
हास्याचा हा रंग नवा
जीवनात तो सदैव उडवा !
हस्याने जीवन वाढवा
दया आनंद भरभरून जीवा !
हसवुनी समाधान मिळवा
मैत्री अन नाती कमवा !
सुखाला हास्याचा साथ हवा
दू:खाना सुद्धा मित्र बनवा !
हास्याचा जीवनी निवारा
बहरे प्रेमाचा फुलोरा
दिसे आपुलकीचा मनोरा
मिले भावबंधाला दुजोरा
देई माणुसकीला सहारा
हाच असे हास्याचा डोलारा !
जो अपेक्षाभंगाताही, कष्टातही
दू:खातही, निराशेतही
हसत आणि हसवत राही
तोचि देवा लाडका होई !
हास्य म्हणजे एक शक्ति
सुख-आनंद-समाधानाची भक्ति
हास्य म्हणजे रेशमधागा
जो आपल्याशी बांधी जगा !
जीवन हे हस्यानेच संपवा
मरणाचेही हसुनी स्वागत करा
यमालाही आपला वाटे हेवा
जीवनालाही स्वत:च गर्व असावा !
आनंद सुखसंपन्न धनी व्हा
माझा हा "कानमंत्र" कायम लक्षात ठेवा !!!



लेखक : __________
 

No comments:

Post a Comment