Wednesday, 18 April 2012

Marathi kavita : प्रेम. . .

आजवर काही मागीतले नाही देवा
पण आज एक वर
हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे

हजार वार झाले या काळजावर
... जवळचीच सोडुन गेली अनोळखी वळणावर
नाती जशी तुच देतोस
त्यांना थोड आयुष्य दे
हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे

एकांतला आपलं मानतो
आता मला कुणीच नको
मीच स्वःताची समजुत घालतो अन तिला त्रासनको
पण जिनं दिलं दुःख मला
तिला भर-भरुन सुःख दे
हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे

ती दुर आहे खुप माझ्या
तरी का ही ओढ आहे
सुःखात असेल ती माझ्याविना हि जानिव गोड आहे
तिच्या जिवनात आनंद आणि हवंतर मला दुःख दे
हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे.....


कवि : _______

No comments:

Post a Comment